1) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1)पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो? एका तासात पृथ्वीवरील----------
05 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात
10 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात
15 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात
20 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात
उत्तर: 15 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात
2) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांचा स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी-------------
दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते
दोन्ही ठिकाणाच्या रेखावृत्तावरील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो
दोन्ही ठिकाणच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो
आंतरराष्ट्रीय वाररेषा नुसार बदल करावे लागतात
उत्तर: दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो
3) कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्ता च्या स्थानिक वेळ---------
15 मिनिटांचा फरक असतो
4 मिनिटांचा फरक असतो
30 मिनिटांचा फरक असतो
60 मिनिटांचा फरक असतो
उत्तर: 4 मिनिटांचा फरक असतो
4)सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चा कालावधी म्हणजे--------
दिनमान
रात्रमान
मध्यरात्र
मध्यान्होत्तर
उत्तर दिनमान
5)सूर्यास्त पासून सूर्योदय पर्यंतचा कालावधी म्हणजे----
दिनमान
रात्रमान
मध्यरात्र
एक दिवस
उत्तर: रात्रमान
6)एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत चा कालावधी-म्हणजे------ होय
दिनमान
रात्रमान
रात्र
एक दिवस
उत्तर: एक दिवस
7) पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते?
पूर्वेकडून पश्चिमेकडे
पश्चिमेकडे पूर्वेकडे
दक्षिणेकडून उत्तरेकडे
उत्तरेकडून दक्षिणेकडे
उत्तर: पश्चिमेकडून पूर्वेकडे
8) सूर्योदयानंतर जसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली--------- हो जाते
लहान
मोठी
आखुड
लांब
उत्तर: लहान
9) जयपूरचे महाराज------- हे खगोल शास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते
सवाई जयसिंग
राजे उदयसिंह
पृथ्वीराज
विजय सिंह
उत्तर: सवाई जयसिंग
एका वाक्यात उत्तरे लिहा
1) सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्यावेळी सावलीची लांबी कशी असते?
सर्वात लांब
समान
सर्वात कमी
यापैकी कोणतेही नाही
उत्तर: सर्वात कमी
2) एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणाची कोणती वेळ?
प्रमाणवेळ
स्थानिक वेळ
जागतिक वेळ
यापैकी कोणतेही नाही
उत्तर: स्थानिक वेळ
3)कोणत्या ठिकाणी सहा महिन्यापर्यंत दिनमान असतो आणि सहा महिने रात्र मान असते
मंगळावर
पृथ्वीवर
ध्रुवावर
विषुववृत्तावर
उत्तर: ध्रुवावर
4) पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी सुमारे किती तास लागतात?
12
24
36
48
उत्तर: 24
5) पृथ्वी एका तासात किती अंश स्वतःभोवती फिरते?
10
15
20
25
उत्तर: 15
6) पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा या ठिकाणी कोणती वेळ झालेली असते?
सकाळ
मध्यान्ह
सायंकाळ
रात्र
उत्तर:मध्यान्ह
7) मुंबई हे शहर 73 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. कोलकत्ता हे शहर 88 अंश रेखा त्यांच्या स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे?
एक
दोन
तीन
चार
उत्तर: एक
8) जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ म्हणून इंग्लंड मध्ये कोणत्या ठिकाणाची स्थानिक वेळ विचारात घेतली जाते
ग्रीनिच
लंडन
मिर्झापूर
यापैकी कोणतेही नाही
उत्तर; ग्रीनिच
9) अमेरिकेतील कोणत्या संस्थेने अचूक वेळ दर्शवितात घड्याळ विकसित केली आहे?
NASA
USSA
NIST
ISRO
उत्तर:NIST
10 भारतातील वेळेच्या अचुकते संदर्भातील सेवा कोणती संस्था पुरवते?
भारतीय अनुसंधान केंद्र
भारतीय राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाला
भारतीय हवामान विभाग
भारतीय वन विभाग
उत्तर: भारतीय राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा
11) मिर्झापूर हे शहर कोठे आहेत?
मध्य प्रदेश
गुजरात
महाराष्ट्र
उत्तर प्रदेश
उत्तर: ,अलाहाबाद ,उत्तर प्रदेश

No comments:
Post a Comment